-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पदोन्नति मध्ये मागासवर्गी यांना आरक्षण मिळावे - रिपाई आठवले एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर यांची राज्य सरकारकडे मागणी

पदोन्नति मध्ये मागासवर्गी यांना आरक्षण मिळावे - रिपाई आठवले एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर यांची राज्य सरकारकडे मागणी

कासोदा ( प्रतिनिधी)  नुरुद्दीन मुल्लाजी

आज दिनांक 1/6/2021रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब याच्या आदेशाने तसेच प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष श्री. रमेशजी मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. राजाभाऊ कापसे,  जळगाव जिल्हा  अध्यक्ष श्री. आनंद खरात साहेब याच्या मागॅदशनाखाली एरंडोल तालुकाध्यक्ष श्री. प्रविण बाविस्कर  तालुका सचिव श्री. देवानंद भाऊ बेहेरे यांचे नेतृत्वाने एरंडोल नायब तहसीलदार श्री. शिरसाठ साहेब यांची भेट घेऊन वरील विषयी निवेदन दिले...

निवेदनाचा आशय असा की , सवोर्च्च न्यायालयाने पदोन्नति मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निदैश दिलेले असतांना मात्र महाराष्ट्र राज्य महविकास आघाडी सरकार हे किती ही पुरोगामी म्हणारे सरकार असले तरी पदोन्नति मधील मागासवर्गीय यांच्या आरक्षण प्रश्नांनी महविकास आघाडी चा बुरखा फाटला आहे.  महविकास आघाडी सरकार हे गोर गरीब मागासवर्गीय आणि दीन दलित विरोधी सरकार ठरले आहे
      तरी एरंडोल तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये यामधील मागासवर्गीयाना पदोन्नति मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित ने घ्यावा.अन्यथा उपरोकत संघटना तफै पुढील तिव्र आदोलंन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी
     या प्रसंगी रिपाई चे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद भाऊ बेहेरे, जितेंद्र वाघ, गजानन पाटील, सिताराम मराठे, इमरान महेमिलखान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

advertising articles 2

-->