माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


जवखेडे सिम ता एरंडोल

उत्सव तीन रंगांचा गगणात आज सजला हिंद हिमालय, गंगा सरस्वती निर्मल वाहूनी सुजलाम सुफलाम सजला नटुनी भारत देशा स्वतंत्रता दिवस आज आनंद उत्सव सन मोठ्या थाटात कोरोना नियमाचे पालन करून माध्यमिक विद्यालय जवखेडेसीम येथे साजरी करण्यात आला त्यानिमित्ताने शाळेचे अध्यक्ष नानासाहेब ज्ञानेश्वर आमले मा. जि. उपाध्यक्ष, मु. पो. संतोष जालम पाटील, उल्हासनगर मानपा कर्मचारी रवींद्र शिवाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष समाधान पाटील, उपसरपंच सखुबाई मोरे,पोलीस पाटील,पंढरीनाथ सोनार, संतोष जालम, दिलीप पाटील अध्यक्ष विविध कार्य. सोसायटी, अरुण मिस्तरी, मा. स.माधव बापू,मा. स.भाईदास दादा, ग्रा. स शिवदास पाटील,ग्रा. स. छोटू बापू,किरण बापू, संजय आमले, से. नि. तुकाराम गुरुजी, आप्पा नगराज पा., yogesh शिंदे, संदीप ठाकरे, विनायक नाना, विनायक दादा (मोठा भाऊ ), भाऊसाहेब शिंदे, पीरण सूर्यवंशी, गुलाब सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी, संदीप (भुरा )आमले,अभिमन सोनवणे, शिक्षण प्रेमी, समाज सेवक, मराठी शाळा शिक्षक रुंद, आरोग्य सेवक कर्मचारी, आशा सेविका व शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमचे अध्यक्ष मा. श्री. नानासाहेब आमले यांनी स्थान स्वीकारले तसेच सरस्वती पूजन आबासाहेब संतोष पाटील यांनी केले आणि ध्वजरोहन दादासाहेब रवींद्र शिवाजी पाटील यांनी केले.   या कार्यक्रम प्रसंगी उपस्तित आबासाहेब, दादासाहेब, अरुण मिस्तरी, आरोग्यसेवक कर्मचारी,मराठी शाळा शिक्षक रुंद यांचा पुष्पगुछ आणि शब्द सुमणांनी स्वागत सत्कार या प्रसंगी करण्यात आले तसेच गावाला अभिमन रुपी गोस्ट म्हणजे आबासाहेब याच्या कन्या तथा इंटरनॅशनल बॅडमिंटन अम्पायर असणाऱ्या पूजा पाटील यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच पूजा ताईने प्रोत्साहन प्रेम दोन शब्द भाषण करून खेळाचे आणि शिक्षणाचे महत्व विषद केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर सर यांनी प्रास्ताविक सादर करून शाळेचे उपक्रम आणि कार्य विस्तृत पणे सांगितले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनार सर यांनी केले व आभार प्रदर्शन दीपक सर यांनी केले





Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या