करमाड खुर्द येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा - तालुक्यातील
 करमाड खुर्द  येथील ५२ वर्षीय महिलेने घरातील छताच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि . १० रोजी सकाळी ६ - ३०  वाजेच्या पूर्वी घडली . मायाबाई राजेंद्र पाटील ( वय ५२ ) रा. करमाड खुर्द यांनी त्यांच्या राहत्या घराच्या छताच्या  कडेला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याने गावातील पोलीस पाटील व नातेवाईकांनी सदर महिलेस पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे .
याबाबत पारोळा पोलिसात बुधा पाटील यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
 तपास जयवंत पाटील  करीत आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या