पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
पारोळा - येथील
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील किसान महाविद्यालया जवळील कासोदा फाटया जवळ मोटर सायकल स्वारास अज्ञात ट्रकने ओव्हरटेक करीत असतांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शहरातील मजुराचा मृत्यु झाल्याची घडना ता,१० रोजी दुपारी १ - ३० वाजता घडली .मुस्तकिम शेख खलील कुरेशी ( वय २९ ) रा कुरेशी मोहल्ला पारोळा हा होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक एम . एच . १८ - वाय ४७७७ ने पारोळ्या कडून एरंडोल कडे जात असतांना एरंडोल कडून येणारा अज्ञात ट्रक वरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन बेदरकारपणे चालवून तो त्याच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना त्याच्याकडून त्यांच्या ताब्यातील वाहनांचा वेग नियंत्रित न झाल्याने तो राँग साईट येऊन मोटरसायकल स्वारास धडक दिल्याने मोटरसायकल स्वार मुस्तकिम शेख यांचा जागीच मृत्यू झाला असून सदर व्यक्तीस पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर योगेंद्र साळुंखे ,प्रमोद सूर्यवंशी यांनी त्यास मृत घोषित केले. या घटने मुळे त्याच्या परिवारावर दुखाचे सावट कोसळले असुन घटनास्थळा वरुन कट मारणारा ट्रक ड्रायव्हर ट्रक घेवून फरार झाला आहे . सदर ट्रक चा शोध घेणे सुरू आहे . या बाबत पारोळा पोलिसात युनूसखान् रशिदरवान कुरेशी यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात ट्रक ड्रायव्हर विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलिस करित आहे
0 टिप्पण्या