एरंडोल प्रतिनिधी
आहे त्याच जागेवर नवीन घरकुल बांधून लाभ मिळावा या मागणीसाठी रिपाई आठवले पक्षाच्या वतीने एरंडोल पंचायत समिती कार्यालय समोर दि 9/3/2022 रोजी पासून ठिय्या आंदोलन करणार
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार आदरणीय रामदासजी आठवले साहेब याच्या आदेशाने व रिपाई महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सिमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एरंडोल तालुकाध्यक्ष ( दक्षता व नियंत्रण समिती सदस्य महाराष्ट्र शासन) प्रविण बाविस्कर व एरंडोल तालुका सचिव तथा ( उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य महाराष्ट्र शासन)देवानंद बेहेरे यांच्या नेतृत्वाखाली आदोलंन करण्यात येईल यांची संबंधितांनी नोंद घ्यावी. उपरोकत विषयी निवेदन आपणास विनंती पूर्वक निवेदन सादर करण्यात येते की, एरंडोल तालुक्यातील तमाम गोर गरीब, मोलमजुरी करणारे बेघर नागरिक ग्रामीण भागात अतिक्रमण जागेवर गेल्या 50 वर्षापूर्वी पासून राहात आहेत. तसेच शासनाने वेळोवेळी शासन परिपत्रक( जी.आर.) काढून अतिक्रमणे नियमाकुल करण्याचे आदेश दिलेले असताना मात्र संबंधित जबाबदारी, संबंधित अधिकाऱ्यांची असताना मात्र याकडे कानाडोळा करून सदरचे अतिक्रमणे नियमाकुल करणेस टाळाटाळ करीत आहेत.
" सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना " शासन परिपत्रक क्रमांक -- प्रआयो-- 2018/ प्र क्रमांक - 256/ योजना-10 तारीख-- 20 ऑगस्ट,2018चे शासन परिपत्रक नुसार अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना दिलेले असताना मात्र, आपल्या एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
मौजे कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील घरकुल मंजूर लाभार्थी गेल्या 50 वर्षे पूर्वी पासून रहात आहेत. सदरहू घरकुल मंजूर लाभार्थींना आहेत त्याच जागेवर नवीन घरकुल बांधून घरकुल योजनेचा लाभ मिळावा. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्न " सर्वांसाठी घरे. 2022 "" हे उद्दिष्टपूर्ती करण्यात यावी.तसेच 19/2/2022 रोजी मुंबई येथे रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब याच्यी भेट घेऊन वरील विषयी निवेदन दिले. मा.मंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेत मा. जळगाव जिल्हयाचे जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र पाठविले आहे. अन्यथा नाईलाजास्तव आपल्या एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर उपरोक्त पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदरचे घरकुल लाभार्थी आपल्या कार्यालयासमोर दिनांक 9/3/2022 रोजी आंदोलन करणार आहेत. होणाऱ्या परिनी मास आपण सर्वस्वी जबाबदार राहणार कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती. सदर निवेदनावर रिपाई एरंडोल तालुकाध्यक्ष तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य महाराष्ट्र शासन प्रविण बाविस्कर व एरंडोल तालुका सचिव तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य महाराष्ट्र शासन देवानंद बेहेरे, गजानन पाटील सरचिटणीस, सिताराम मराठे सल्लागार कासोदा शहर अध्यक्ष मन्सूर पठाण, बशीर भाई इमरान खान देवीदास जाधव, बबन सोनवणे, जहीरभाई, यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या