मुडी बोदर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा...!



अमळनेर प्रतिनिधी

 अमळनेर तालुक्यातील मुडी बोदर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या ध्वजारोहणासाठी केंद्रीय नवोदय समितीचे सदस्य तसेच जि प शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री तुषार उत्तमराव सैंदाणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश शिंपी सर यांनी केले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक तसेच मेरी मिट्टी मेरा देश या देशव्यापी संकल्पनेवर त्यांनी प्रकाश झोत टाकला 15 ऑगस्ट ला माननीय पंतप्रधान झेंडा फडकवतात तर 26 जानेवारीला माननीय राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण देश 15 ऑगस्ट ला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपतीपद अस्तित्वातच आले नव्हते  15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरक फासाचे दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो त्याला फ्लॅग ऑन फ्लोरिंग म्हणतात 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला व भारताचा झेंडा वर चढला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःचे राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओळीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फडकवणे असे म्हणतात 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो आपण ज्या महान अशा देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे अशा या भव्य दिव्य ध्वजारोहण समारोह शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष श्री तुषार भाऊ सैंदाणे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मुडी प्रगणे डांगरी चे सरपंच माननीय काशिनाथ भाऊ महाजन तसेच माजी सरपंच संजय पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र पाटील बोदरडे येथील सरपंच प्रवीण संधान शिव तसेच उपसरपंच नितीन पाटील ग्रामसेवक राहुल पाटील तलाठी भदाणे भाऊसाहेब विकास पाटील पीडी बोरसे शांतीलाल पाटील हिरालाल बडगुजर अविनाश पाटील पोलीस पाटील तसेच  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ साळुंखे पिंगळे सर डॉक्टर मोहन धनगर व नवनाथ पाटील आणि माजी मुख्याध्यापक रमेश पाटील सर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा वर्कर सुनिता सैंदाणे उषाबाई पाटील गायत्री सैंदाणे ज्योती पाटील स्वाती कदम रागिणी लांडगे मॅडम कविता पाटील अलकाबाई सैंदाणे तसेच झेड डी सोनवणे हायस्कूल चे मुख्याध्यापक अनिल पाटील सर तसेच संपूर्ण शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळी यांचे प्रमुख उपस्थिती हा दिमागदार सोहळा संपन्न झाला उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री सतीश शिंपी सर यांनी केले तसेच बोदर्डे ग्रामपंचायतच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचा परिवाराचा सत्कार सोहळा श्री प्रवीण संधान शिव व नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच केंद्रीय आदेशान्वये माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संदेश शिलालेखाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते





Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या