माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम येथे स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा...!


जवखेडे सिम ता एरंडोल

आज 15 आगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन त्याचेच औचित्य साधत आज माध्यमिक विद्यालय जवखेडे सीम येथे गावातील प्रगतशील शेतकरी श्री शंकर अर्जुन सोनवणे ( न्हावी ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून  स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला  तसेच इ 7 विच्या विद्यार्थीनी देश भक्तीपर गीत सादर केले त्यानंतर इ 10 विच्या विद्यार्थ्यांनि महिलांवर होणारे सामूहिक अत्याचार वर आधारित नाटक आणि इ 8 विच्या विद्यार्थिनींनी  बेटी बचाव हम शान है इस देश की या गीतावर नृत्य सादर करून सर्वांचे मनमोही करून कार्यक्रम अधिक द्विगुणित केला त्यानंतर मागील वर्षी इयत्ता दहावी पास झालेल्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक विद्यार्थिनींना बक्षीस देऊन त्यांचा स्वागत करण्यात आले तरी या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री नानासाहेब ज्ञानेश्वर आमले जवखेडे सिम चे सरपंच ठगूबाई सोनवणे  ग्रामपंचायत सदस्य किशोर आमले अर्जुन भदाणे भाऊसाहेब शिंदे नामदेव मिस्तरी सोनू भिल , माजी सरपंच माधव बापू भाईदास दादा विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाळू तुकाराम भदाणे छोटू बापू शिवदास गावाले योगेश शिंदे संदीप आमले शंकर सोनावणे दादाभाऊ पाटील गुलाब सूर्यवंशी तसेच गावातील सर्व शिक्षणप्रेमी समाज प्रेमी विद्यार्थी प्रिय पालक आणि माता भगिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब आरोग्य सेविका मॅडम आशा सेविका मॅडम बचत गटातील महिला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद तथा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य सादर केले आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक देखणा सोहळा मनाला भावणारी नाटिका गोंडगाव आणि धुळपिंपरी येथे घडलेल्या बलात्कार आणि निर्गुण हत्या चा निषेध म्हणून सुंदर सा देखावा त्या ठिकाणी सादर केला आणि महिला सबलीकरणाचा संदेश देत बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत असे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी द्या या घोषणेने निषेध केला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सोनार सर यांनी केले.














Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या