उत्राण येथे जिल्हा परिषद शाळेत पुस्तक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न


उत्राण (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा उत्राण गुजर हद्द व उत्राण अहिर हद्द येथे संचालक विलास महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना ‘सचित्र बालमित्र’ या उपयुक्त व माहितीपूर्ण पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांची जोड. विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची भेट देत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. यावेळी विलास महाजन आणि अमोल महाजन यांचा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली उपस्थिती व प्रेरणा दिलेल्या मान्यवरांमध्ये एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, मा. सरपंच विनोद महाजन, राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, योगेश महाजन, मा. सदस्य अमोल महाजन, पोलीस पाटील राहुल महाजन, संचालक संतोष चौधरी, राजू कोळी, तसेच शिक्षकवर्गातून मुख्याध्यापक सैदाने सर, वंदना पाटील, जळकोटे सर, माळे सर, विजय पाटील सर, सोनवणे मॅडम, खैरनार सर, प्रगती खेडकर, अहिर हद्दचे मुख्याध्यापक साळुंखे सर, अनिल पाटील, राजू पाटील, राजेश सोनवणे, नितीन पाटील, युवराज वानखेडे, भूषण पाटील यांचा समावेश होता.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तके मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन विलास महाजन यांनी केले.

हा उपक्रम समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला असून, ग्रामस्तरावर शिक्षणविषयीचे जागरुकतेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या