-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

महिला सक्षमीकरणासाठी शिवकमल संस्थेचा पुढाकार; गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप

महिला सक्षमीकरणासाठी शिवकमल संस्थेचा पुढाकार; गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप
उत्राण, तालुका एरंडोल – महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू व वंचित घटकातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने एरंडोल येथील साईलीला पार्क येथे शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल गोविंदा महाजन व सचिव सौ. रेणुका अमोल महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या एरंडोल तालुका समन्वयक सौ. देवयानी महाजन व श्री. कृष्णा महाजन यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमास लाभार्थी म्हणून विजया मनोहर पाटील, अर्चना अशोक येवले, जागृती यशवंत मोरे, सरला शामकांत वर्डीकर, अर्चना ईश्वर पाटील, प्रतिभा आत्माराम चौधरी, अर्चना सुरेश गोसावी, कविता प्रशांत महाजन, लताबाई किशोर धनगर, देवयानी महाजन, भारती सुरेंद्र लांडगे, प्रियंका वर्डीकर, वैशाली भरत धनगर, माधवी सुनील तायडे आदी महिला उपस्थित होत्या. तसेच परिसरातील मान्यवर नागरिकांचीही उपस्थिती लाभली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल परिसरातून संस्थेचे कौतुक होत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

advertising articles 2

-->