कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला मारणाऱ्या फसव्याला बेड्या ठोका; ह्युमन राइट्स फाउंडेशनची लोणी पोलिसांत धडक
मार्च ०२, २०२६
लोणी प्रवरा (प्रतिनिधी):
सामान्य कष्टकरी, शेतमजूर आणि गोरगरीब नागरिकांच्या विश्वासाला काळिमा फासणाऱ्या फसव्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड हडप करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोषीवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, या मागणीसाठी ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया आणि अनेक पीडित नागरिकांनी लोणी प्रवरा पोलीस ठाण्यावर धडक दिली.
भूलथापा देऊन लुबाडणूक; गरिबांचे संसार उघड्यावर
मिळालेल्या माहितीनुसार, आणि परिसरातील अनेक गरीब कुटुंबांनी आपल्या कष्टाची कमाई, जुने सोने आणि रोख रक्कम या फसव्याकडे विश्वासाने सोपवली होती. कुणी मुलीच्या लग्नासाठी दागिने घडवायला दिले होते, तर कुणी अडीअडचणीला पैसे मिळतील म्हणून दागिने गहाण ठेवले होते. मात्र, हा आता दागिने आणि पैसे दोन्ही देण्यास टाळाटाळ करत असून, पसार झाला आहे,'वरुन गोर गरीबांना आरे वारीची भाषा करतो, आज-उद्या'च्या वांझोट्या आश्वासनांनी नागरिकांना मानसिक छळ सोसावा लागत आहे.
अन्यायाविरुद्ध ह्युमन राइट्स फाउंडेशनचा एल्गार
गोरगरिबांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही, अशी भूमिका घेत ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे समन्वयक राजेंद्र कुलथे आणि सुवर्ण भरारी सेवाभावी संस्थेच प्रसिद्धी प्रमुख रवींद्र माळवे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. पोलीस प्रशासनाला निवेदन देताना त्यांनी ठणकावून सांगितले की, "एकीकडे सर्वसामान्य माणूस घामाचा पैसा साठवून सोन्याचा कण जमवतो आणि दुसरीकडे असे प्रस्थापित सोनार त्यांच्या विश्वासाचा खून करतात. अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे."
पोलीस प्रशासनाला इशारा: "गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन"
पोलीस ठाण्यात जमलेल्या पीडित महिला आणि पुरुषांचा संताप अनावर झाला होता. ह्युमन राइट्स फाउंडेशनने पोलिसांना दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
सबंधित फसव्यावर तातडीने कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी.
पीडित नागरिकांचे सोने आणि रक्कम व्याजासह परत मिळवून द्यावी.
जर पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई करू नये फसव्याला पाठीशी घालू नये, तर पोलीस ठाण्यासमोर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
"आम्ही कष्टाने कमावलेले सोने त्या फसव्यानी गिळंकृत केले आहे. आता पोलीस आम्हाला न्याय मिळवून देतात की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे," अशा संतप्त भावना फसवणूक झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.
लोणी प्रवरा पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी लगेच सुरू करू लवकरच कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
*गोर गरीबांची फसवणूक करून गरीबांन वर रुबाब करणार्या फसव्याचा चेहरा उघडा करण्या करीता जीव गेलातरी हरकत नाही असे मनोगत रवि माळवे यांनी व्यक्त केले*