-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

तळईत लाळखुरकत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन

तळईत लाळखुरकत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन

तळई (ता. एरंडोल): पशुवैद्यकीय चिकित्सालय आडगाव अंतर्गत तळई येथे लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण फेरी-८ अंतर्गत विशेष लसीकरण आणि जंतनिर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला परिसरातील शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठा प्रतिसाद दिला.
हे शिबीर डॉ. प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. याप्रसंगी डॉ. योगेश महाले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. लाळखुरकत या आजारामुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची माहिती देऊन त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला. तसेच, वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्या निवाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी असावी, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. यशवंत धावसे, डॉ. सुदर्शन पाटील, अविनाश थोरात, शामलाल सोनार आणि पोलीस पाटील महेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे पशुधनाचे आरोग्य सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

advertising articles 2

-->