चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी संजय मोरे यांची बिनविरोध निवड
मार्च २८, २०२६
चाळीसगाव (किशोर जाधव ) – दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज यांच्या कर्मचारी पतसंस्थेची मासिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत श्री. संजय भिमराव मोरे यांची पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड जाहीर होताच सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवर व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत केले. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात श्री. मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी आदरणीय प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, पतसंस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. एस. डी. भामरे, सेक्रेटरी प्रा. ए. एस. पाटील तसेच पतसंस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. मोरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व पतसंस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.