भातखेडे येथे स्व. सागर भाऊ रायगडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्रिवेणी कार्यक्रम संपन्न

भातखेडे येथे स्व. सागर भाऊ रायगडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्रिवेणी कार्यक्रम संपन्न

भातखेडे (ता. एरंडोल) : स्व. सागर विरभान रायगडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त भातखेडे येथे उद्घाटन व सत्कार सोहळ्याचा त्रिवेणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्व. सागर भाऊ रायगडे यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून व स्वखर्चातून गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेसाठी ‘कंपार्टमेंट / डेस्क’ तयार करण्यात आले. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.

याच वेळी गावातील श्री अरुण नथू पवार यांच्या कन्या कु. उज्वला अरुण पवार यांची महावितरणमध्ये ‘सहाय्यक तंत्रज्ञ’ पदावर निवड झाल्याबद्दल तसेच पिंप्री येथील श्री मुरलीधर चतुर पाटील यांचे सुपुत्र खुशाल मुरलीधर पाटील यांची धुळे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तळई येथील सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत खुशाल पाटील यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभ्यासिकेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर. एस. पाटील यांनी केले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री प्रतीक जाधव, श्री यशवंत खुशाल पाटील व श्री अरुण नथू पवार यांनी आपली मनोगते व्यक्त करत स्व. सागर भाऊ रायगडे यांच्या कार्याची आठवण करून दिली व युवकांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप महेंद्र (बबलू) पाटील यांनी केला.

या प्रसंगी गावाचे पोलीस पाटील शामकांत युवराज पाटील, रघुनाथ पांडुरंग पाटील, रामराव धनराज पाटील, अरविंद यादव कुलकर्णी, प्रवीण सुकलाल पाटील, ज्ञानू माणिक पाटील, सुभाष पुरुषोत्तम पाटील, विलास पाटील सर, वासुदेव मोरे सर, महेंद्र पाटील (पिंप्री), इब्राहिम मण्यार, धनंजय रायगडे, निलेश पाटील, खुशाल बागुल तसेच छत्रपती ग्रुप भातखेडा चे अध्यक्ष तुषार नारायण पाटील, उपाध्यक्ष सुदर्शन गजानन पाटील व सागर भाऊ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.