-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्राण येथे २५ मार्च रोजी रंगणार जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; १२ दुचाकींचे भव्य बक्षीस!

उत्राण येथे २५ मार्च रोजी रंगणार जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; १२ दुचाकींचे भव्य बक्षीस!
उत्राण (प्रतिनिधी - जैनुल शेख):
जळगाव जिल्ह्यातील बैलगाडा शौकिनांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे येत्या २५ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तब्बल १२ दुचाकी वाहने बक्षीस म्हणून देण्यात येणार असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बक्षीस देण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
भव्य उद्घाटन सोहळा
सदर स्पर्धेचे उद्घाटन २५ मार्च रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सतीश अण्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एरंडोल तालुकाध्यक्ष भागवत दादा भिकन पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. जिल्हाधिकारी (कलेक्टर) आणि पोलीस अधीक्षक (एस.पी.) यांच्या रितसर परवानगीने या खेळाचे नियोजन करण्यात आले आहे.
दोन गटांत होणार थरार; १२ मोटारसायकलचे आकर्षण
ही स्पर्धा प्रामुख्याने दोन गटांत विभागली गेली असून प्रत्येक गटासाठी ६ अशा एकूण १२ दुचाकींची खैरात करण्यात आली आहे:
१) एक आदत एक बैल मैदान: या गटातील विजेत्यांना ६ दुचाकी बक्षीस दिल्या जातील.
२) एक दुसा एक बैल मैदान: या गटासाठीही ६ मोटारसायकल बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या आहेत.
सहभागाचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक स्पर्धा ठरणार आहे. तरी उत्राण, तळई जिल्हा परिषद गटासह संपूर्ण खानदेशातील बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व तालुकाध्यक्ष भागवत भिकन पाटील आणि त्यांच्या समस्त मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

advertising articles 2

-->