-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; लैंगिक अत्याचारप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; लैंगिक अत्याचारप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
कासोदा :नुरुद्दीन मुल्लाजी कासोदा पोलीस ठाणे हद्दीत 15 वर्षे 11 महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेचा पती, सासरे, सासू तसेच तिचे वडील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 126/2026 अन्वये 19 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.37 वाजता भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1) व 3(5), POCSO कायद्याचे कलम 4(1), 4(2), 6(1) तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 चे कलम 9, 10 व 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक शारदा गोकुळ भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 ऑगस्ट रोजी कासोदा पोलिसांना धुळे शहर पोलीस ठाण्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली होती. हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे एका अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पोलीस पथकाने तेथे जाऊन मुलीची चौकशी केली.

चौकशीत मुलीचे वय 15 वर्षे 11 महिने असल्याचे निष्पन्न झाले. तिचा विवाह अल्पवयीन असतानाच 20 जून 2025 रोजी संबंधित तरुणासोबत करण्यात आल्याचे समोर आले. विवाहानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली आणि 6 ऑगस्ट 2026 रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिल्याचे तपासात उघड झाले.

मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या तसेच तिच्या पतीच्या कुटुंबीयांना असतानाही विवाहास संमती देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील करीत आहेत.

advertising articles 2

-->