जिल्हा काँग्रेसतर्फे २५ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव..!
सप्टेंबर ०६, २०२६
जळगाव :- नुरुद्दीन मुल्लाजी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील २५ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. काँग्रेस भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी तसेच एससी सेलचे अध्यक्ष कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे कौतुक करत राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये रूपाली पाटील (पाचोरा), सुनीता पाटील, रूपाली देवरे, डॉ. अर्चना सूर्यवंशी, अनिता सतीश पाटील, प्रा. सागर सोनवणे (जळगाव), प्रसन्न रमेश खंडाळे (चाळीसगाव), भटू आव्हाळे (एरंडोल), राजेंद्र मधुकरराव देशमुख (अमळनेर), प्रमोद धर्मराज पाटील (धरणगाव), हिलाल पुंडलिक पाटील (अमळनेर), विनोद प्रकाश पाटील, दीपक हरी सोनार (चोपडा), प्रा. वासुदेव पाटील, गजानन अशोक सुरवाडे, मोहसीन खान अजिज खान, अशोक सोनू पार्टी, मनोहर भजनलाल तेजवानी, डॉ. संजय कुमार सोनवणे (धरणगाव), सुनील भिवा जाधव (पारोळा), प्रा. इक्बाल मिर्झा, नरेंद्र भोई (जळगाव), भिका सोमा सपकाळे (आवार, ता. जळगाव) आणि दिनेश नवल चव्हाण (एरंडोल) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक सोनवणे, मुजीब पटेल, कौस्तुभ पाटील, जाकीर बागवान, अर्चना गाडे, छाया कोरडे, लीला सोनवणे, प्रभाकर महाजन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.