-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा-बांभोरी परिसरात ३० रक्तदात्यांचे योगदान; एस.टी.डी. ग्रुपच्या उपक्रमातून मानवसेवेचा संदेश, इतर गणपती मंडळांसाठी प्रेरणादायी पाऊल..!

कासोदा-बांभोरी परिसरात ३० रक्तदात्यांचे योगदान; एस.टी.डी. ग्रुपच्या उपक्रमातून मानवसेवेचा संदेश, इतर गणपती मंडळांसाठी प्रेरणादायी पाऊल..!

एस.टी.डी. ग्रुपचा राजा गणपती मित्र मंडळाचा उपक्रम; गणेशोत्सवाला समाजसेवेची जोड
कासोदा : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देत समाजोपयोगी कार्याला चालना देता येते, हे बांभोरी येथील एस.टी.डी. ग्रुपचा राजा गणपती मित्र मंडळाने दाखवून दिले. श्रीकृष्ण नगर व पांडे नगर परिसरात मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेच्या कार्यात योगदान दिले.

गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरजू रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता भासत असताना रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना मदत करता येते, या सामाजिक भावनेतून रक्तदात्यांनी सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

या रक्तदान शिबिरासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि श्रीकांत पाटील, चालक मनोज पाटील, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पारधी, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदआण्णा पाटील, जवखेडे सोसायटीचे माजी चेअरमन हिंमतआण्णा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक तथा कासोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करदादा चौधरी, शिवसेना ता. प्रमुख रवी चौधरी, वनकोठे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीपआप्पा वाघ, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राहुल चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मयूर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख सोनवणे, वासुदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य भारत चौधरी, देशदूतचे पत्रकार यु. टी. महाजन, कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. वाघ, वाणी सर, प्रशांत पाटील, विजय दोधू पाटील, नाना पाटील तरडीकर, माजी सरपंच संजय खंडू चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य तात्यासो आणि अजितराव पाटील यांच्यासह नागरिक, भक्तगण व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष लोकेश पाटील, उपाध्यक्ष चेतन चौधरी, तुषार धनगर, सागरभाऊ चौधरी, निलेश सूर्यवंशी, गणेश चौधरी, संजय चौधरी, बबलू चौधरी, सुमित होतोले, लोकेश चौधरी, भूषण चौधरी, दीपक पाटील, गोपाल चौधरी तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

गणेशोत्सवाच्या काळात रक्तदानासोबतच आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंसाठी मदत अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळाल्यास उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप प्राप्त होते. याच भावनेतून एस.टी.डी. ग्रुपचा राजा गणपती मंडळाने घेतलेला पुढाकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी काळातही गणेश मंडळांनी समाजहिताचे विविध उपक्रम राबवावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांसह उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले.

advertising articles 2

-->