अनधिकृत शाळा व अल्पसंख्यांक शाळांवर कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईसा संघटनेकडून इशारा

अनधिकृत शाळा व अल्पसंख्यांक शाळांवर कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईसा संघटनेकडून इशारा

 एरंडोल 
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल-शहर व तालुक्यात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा, शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे कुठलेही शासनाचे निकष न पाळता सर्रासपणे मुलांच्या भवितव्याशी या शाळांनी खेळ मांडल्याबाबत परिसरातील पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.तसेच काही अल्पसंख्यांक शाळांमध्ये अल्पसंख्यांक जातींच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे.व त्यासाठी सदर शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अल्पसंख्यांकांसाठी शाळा या आशयाची जाहीरात तालुक्यात सर्वत्र करावयास पाहीजे असे असतांना देखील मात्र सदर अल्पसंख्यांक शाळांमध्ये एकही  अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांला मोफत कींवा अत्यल्प फीमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.उलट सदर शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात फी घेवून, इतर प्रगत समाजातील सधन/ नोकरदार  पालकांच्या मुलांना प्रवेश दिला जातो.आणि तोही मुलांची लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेतली जाते. त्यासोबतच पालकांचीही मुलाखत घेतली जाते,वास्तविक पाहता शासनाच्या नियमाप्रमाणे मुलांची कुठल्याही प्रकाराने तोंडी/लेखी मुलाखत घेणे यावर बंदी असतांना मनमानी पध्दतीने या शाळा प्रवेश देत आहेत.त्यामुळे सदर अल्पसंख्यांक शाळांमध्ये फक्त हुशार मुलांनाच प्रवेश दिला जातो परिणामी ज्या मुलांना प्रवेश मिळत नाही त्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.अशी परिसरात सर्वत्र चर्चा आहे. यामुळे  अभ्यासात सर्वसाधारण असणा-या मुलांच्या बालमनावर विपरीत परीणाम होऊ शकतो.तरी अश्या अल्पसंख्यांक शाळांवर शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई होणे क्रमप्राप्त असतांना देखील दुर्लक्ष  केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.म्हणून सदर बाबतीत शिक्षण विभागाचे लक्ष वेधून  त्वरित सदर शाळांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणेसाठी इंडीपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (IESA)  या राज्यव्यापी संघटनेच्या एरंडोल तालुका ईसा संघटनेकडून  मा.गटशिक्षणाधिकारी,पं.स.एरंडोल यांना काल लेखी निवेदन देण्यात आले.सदर बाबतीत त्वरीत योग्य कार्यवाही न झाल्यास   सांविधानिक मार्गाने संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे ईसा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रमोद पाटील व एरंडोल तालुकाध्यक्ष श्री.देवमन माळीसर यांनी लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.सदर प्रसंगी संघटनेचे शहरातील मान्यवर सभासद, संस्थाचालक श्री. अमितदादा पाटील,श्री.विजयआण्णा महाजन,श्री.सचिनभाऊ विसपुते आदी सर्व इंग्रजी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या