पाचोऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे पुन्हा जनता कर्फ्यु ची घोषणा!आ.किशोरआप्पा पाटील
जि जळगाव
ता प्रतिनिधी शहेबाज शेख
पाचोऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे पुन्हा जनता कर्फ्यु ची घोषणा!आ.किशोरआप्पा पाटील
पाचोरा. जिल्ह्यात कोरोणा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.पाचोरा तालुका पुर्ण पणे कोरोणा मुक्त झाले होते.मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात आणि तालुक्यात रूग्ण कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येते आहे.शहरात कोरोणाची साखळी तोडण्याकरीता. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पुन्हा जनता कर्फ्युची घोषणा केली आहे.जनता कर्फ्यु दि.27 जून ते 30 जून पर्यंत सलग चार दिवस असणार.अत्यावश्यक सेवेत.दुध विक्री सकाळी 6 ते 11 व संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.
दुध विक्री वगळता इतर थंड पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
शहरात किराणा दुकान, भाजीपाला विक्री पुर्णपणे बंद ठेवण्यावर अखेर एकमत आहे. वैद्यकीय सेवा आणि मेडिकल सुरू राहतील.
शहरात सर्व पक्षीय प्रतिनिधी, व्यापारी.व पत्रकारांचा उपस्थित मध्ये जनता कर्फ्युवर एकमत.
तरी नागरिकांनी जनता कर्फ्यु चे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले

0 टिप्पण्या