शिंदखेडा येथे राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती मार्फत शिंदखेड्याचे तहसीलदार यांना निवेदन सादर
ता अमळनेरप्रतिनिधी सत्तार खान
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती ,जमाती, भटके-विमुक्त, मुस्लिम, मूलनिवासी बहुजन यांच्यावर होत असणारा अन्याय-अत्याचार, अल्पवयीन बलात्कार तसेच बीड जिल्ह्यातील पारधी लोकांचे हत्याकांड अडापुरी येथील दोन युवकांवर झालेला प्राणघातक हल्ला, नागपूरचा उच्चशिक्षित अरविंद बनसोडे हत्या प्रकरण,पुणे पिंपरी य चिंचवड येथील विराज जगताप खून प्रकरण, पालघर येथील मोब लिंचींग मध्ये डवरी गोसावी साधूंची झालेली हत्या अशा अनेक घटनांच्या संदर्भात शिंदखेडा तालुका तहसीलदार साहेबां मार्फत माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती(NAPF) या संघटनेमार्फत शिंदखेड्याचे NAPF चे संयोजक मा. संजय कुमार जाधव,मा.शशिकांत आण्णा बैसाणे,मा.सुनिल थोरात, मा.दिनेश मोरे,मा.संजय ढिवरे आदि उपस्थित होते.*

0 टिप्पण्या