आमदार गोपीचंद पडवळकर याच्या जाहीर निषेधार्थ जोडे मारो आंदोलन...
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाणमुक्ताईनगर- राष्ट्रवादि युवक कॉंग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री राहून चुकलेल्या आदरणीय शरद पवार साहेबांविषयी वादग्रस्त विधान करणारा, भाजप नेत्यांची पुढेपुढे करून आमदारकी मिळवलेल्या गोपीचंद पडळकर याने आदरणीय शरद पवार साहेबांविषयी बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे.
गोपीचंद पडळकर ला आज प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथे जोडे मारो आंदोलन करून त्याचे बॅनर पेटवण्यात आले ..गोपीचंद पडळकरनी लवकरात लवकर आदरणीय शरद पवार साहेबांची माफी मागावी. अन्यथा जिथे भेटेल तिथे त्याचे तोंड काळे करण्यात येईल व गोपीचंद पडवळकर यांनी बाहेर फिरून दाखवा जेथे दिसतील तेथे राष्ट्रवादि युवकचे कार्येकर्ते चोप देनार असा इशारा राष्ट्रवादि युवक चे जिल्हाध्यक्ष- रविंद्र नाना पाटील व उप जिल्हा अध्यक्ष ऍड पवनराजे पाटील यांच्या वतीने देण्यात आला ..
आदरणीय शरद पवार यांच्यावर भलते सलते आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा हास्यास्पद प्रकार गोपीचंद पडळकर करत आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांच्या मनात संतापाचे वातावरण आहे .
कोरोनाच्या काळात प्रशासनाने घरी थांबून सुरक्षित राहण्याचे आवाहन केलेले असताना, असे वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत याला कारणीभूत गोपीचंद पडळकरवर गुन्हे दाखल करून त्याची आमदारकी रद्द करावी. अशी मागणी समस्त जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे याची दखल घेण्यात यावी अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्यात येईल...
त्यावेळी राष्ट्रवादि युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष ॲड पवनराजे पाटील,युवक तालुकाअध्यक्ष शाहिद खान,ऋषिकेश पाटील , रोहित सोनावणे , अविनाश जैन , लखन पाटील , नरेंद्र पाटील , सोनू पाटील , श्रीकांत पाटील , प्रमोद सॊन्दले , विकी ठाकरे , उमेश भोलाणे , प्रशांत पाटील , सागर भोई तसेच युवक राष्ट्रवादी चे कार्यकर्तउपस्थित होते ..

0 टिप्पण्या