बोदवड तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी घेतली तातडीची आढावा बैठक...

बोदवड तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी घेतली तातडीची आढावा बैठक...


प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
बोदवड शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत., आज रोजी ८० च्या पुढचा आकडा कोरोना रुग्णांनी शहरासह तालुक्यात गाठला आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी आज बोदवड येथील शासकीय विश्रामगृहात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, शहरातील व्यापारी वर्ग, पोलिस प्रशासन, डॉक्टर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. सर्व जनतेने दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी नागरीकांना यावेळी केले. त्याप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे., व जो कोणी नियम पाळणार नाही किंवा प्रशासनाला सहकार्य न करता विनामास्क फिरतांना आढळून आल्यास किंवा व्यावसायिकांनीही प्रशासनाला सहकार्य न करता नियम न पाळल्यास अश्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी नगरपालिका व पोलिस प्रशासनाला यावेळी केल्या.
जय महाराष्ट्र!..संतोष कोळी (आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय सहाय्यक)
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या