हॉटेल सील गुन्हा दाखल एरंडोल शहरात जमावबंदीचे उल्लंघन
ता एरंडोलप्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल येथील मनीष रेस्टॉरंट वर नगरपालिका पथकाची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरपालिका ने कारवाई करून हॉटेल सील केली आहे व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
कोरोना च्या काळात संसर्गजन्य आपत्तीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश दिले आहे या आदेशाला झुगारून मनीष रेस्टॉरंट चे संचालक सुभाष बन्सीलाल मानूधने यांनी वेळेव्यतिरिक्त आपले कार्य सुरू ठेवले होते यापूर्वीही त्यांना सूचना दिली होती ती त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालिका प्रशासनाने कलम 188 मधील आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली आहे व व हॉटेलला सील केले आहे पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ क्षेत्रीय अधिकारी एस आर ठाकूर कर्मचारी आशिष परदेशी वैभव पाटील लक्ष्मण ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली

0 टिप्पण्या