रुपेश पाटील यांची कृषी पदवीधर संघटनेच्या एरंडोल तालुकाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी हेमराज चौधरी
फरकांडे तालुका एरंडोल( वार्ताहर) येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रुपेश शालीग्राम पाटील यांची महाराष्ट्र कृषी पदवीधर संघटनेच्या एरंडोल तालुका विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी प्रणव महाजन, सचिव नयन पाटील कार्याध्यक्ष अक्षय पाटील तर संघटक म्हणून मनीष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
कृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील कृषी व संलग्न पदवीधर बांधवांची सर्वोच्च संघटना असून स्वयं सेवेने पदवीधर युवक विद्यार्थी व शेतकरी वर्गाचे विविध समस्या व प्रश्नांची सोडवणुकीसाठी कार्य करीत असते, रुपेश पाटील व सहकाऱ्यांचे कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील यांच्या आदेशान्वये, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज खोमणे प्रदेश कार्याध्यक्ष मयुर महाजन प्रदेश उपाध्यक्ष मनिष भदाणे जळगाव जिल्हा अध्यक्ष ऋषी देवरे यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली रुपेश पाटील व सहकाऱ्यांचे निवडीचे प्राध्यापक प्रवीण देशमुख, प्राध्यापक राहुल पाटील प्राध्यापिका पूजा हिरादेवे, योगेश पाटील, तेजपाल गिरासे, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहेजळगाव दिलासा केंद्र अध्यक्ष साहेबराव पाटील, उपाध्यक्ष सुधीर वसाने, फरकांडे विकास सोसायटी माजी चेअरमन राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

0 टिप्पण्या