आर बी आर कन्या माध्यमिक विद्यालय पहूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण 

आर.बी.आर.कन्या माध्यमिक विद्यालय,पहूर ता.जामनेर या विद्यालयात 15 आँगस्ट 2021 रोजी सकाळी ठीक 7=30 वाजता 75 वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक भाऊसो. विनोदजी गोंधनखेडे हे होते. प्रमुख अतिथी जि.प.जळगाव चे माजी सभापती भाऊसो.प्रदीपजी लोढा हे होते. तिरंगा ध्वजाचे पुजन माजी सैनिक विनोदजी गोंधनखेडे यांनी केले. आणि ध्वजारोहण इ.10वी ला प्रथम आलेली विद्यार्थीनी कु. दिशा बापू पाटील हीने केले.

       नंतर इ.10वी ला प्रथम, द्वितीय, व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यीनींना रोख बक्षीस व फुल पुष्प देऊन गौरविण्यात आले. प्रथम~दिशा बापू पाटील 95.80 टक्के, द्वितीय~सम्रुद्धी भारत तरवाडे 93.60टक्के व तिसरी~सोज्वल गणेश पाटील 92.60 टक्के. तसेच चि.अनिरुद्ध विवेक देशमुख या विद्यार्थ्यांने शाळेसाठी तिरंगा ध्वज दिल्याबद्दल त्याचा सुद्धा रोख 501रूपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

       शाळेतील नवीन प्रवेश घेतलेल्या एकूण 38 विद्यार्थीनींना मा.प्रदीपजी लोढा व संस्था सचिव  मा.अरूण पवार साहेब यांच्या कडून गणवेशाचे वाटप करण्यात आले.

        सदर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विनोदजी गोंधनखेडे, प्रमुख अतिथी मा.प्रदीपजी लोढा,मा.अरूणजी घोलप,मा.प्रल्हादजी वानखेडे, डॉ.प्रशांतजी पांढरे, मा.शैलेश पाटील, मा.अशोक दादा पाटील,मा.प्रदीपजी पवार मा.शरदजी पांढरे,मा.सुरेशजी पाटील,मा.कडूबा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आय.व्ही.पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री. सुधिर महाजन सर यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला


























Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या