प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल, दि. १६ जानेवारी २०२५: एरंडोल तालुक्यातील ग्रामस्थांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्याची संधी मिळणार आहे. दि. १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, एरंडोल येथील पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी श्री. मनिषकुमार गायकवाड साहेब उपस्थित राहणार आहेत.
कोण उपस्थित राहावे?
* एरंडोल तालुक्यातील सर्व ग्रामस्थ: आपल्या समस्यांबाबत प्रशासनाकडे मांडण्यासाठी आपल्याला ही संधी सोडू नये.
* विशेषतः: उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, अमळनेर, तहसीलदार एरंडोल, पारोळा, धरणगाव, गटविकास अधिकारी एरंडोल, पारोळा, धरणगाव, पोलिस निरीक्षक एरंडोल, कासोदा, पारोळा, धरणगाव यांच्या स्तरावरील कोणत्याही अडचणी असल्यास आपण या बैठकीत आपल्या मतांचे निवेदन करू शकता.
आवाहन:
रिपब्लिकन पक्ष एरंडोल तालुकाध्यक्ष श्री. प्रवीणभाऊ बाविस्कर आणि तालुका सचिव श्री. देवानंद भाऊ बेहेरे यांनी सर्व ग्रामस्थांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या