जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनच्या संचालक पदी प्रमोद पाटील बिनविरोध


एरंडोल : तालुक्यातील कै आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटींग फेडरेशनच्या निवडणूकीत बिनविरोध निवड झाली . जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनची स्थापना माजी आमदार स्व रामराव जिभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९४६ मधे स्थापना करण्यात आली होती सहकारी संस्थाची शिखर संस्था म्हणून जिल्ह्यात नावाजलेली संस्था . फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हयातील सहकारी संस्थांना खते पुरवठा केला जात असतो होलसेल स्वरुपात संस्थेचा कार्यभार चालत असतो या संस्थेवर जिल्हयातील सहकार महर्षी कै प्रल्हादराव पाटील , उदेसिग आण्णा पवार ', सहकार महर्षी दामूभाऊ पाटील , यांच्या सह अनेक सहकार महर्षी नी नेतृत्व केले आहे . सध्या जिल्हा बॅकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज चालू आहे . त्याच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या . खरेदी विक्री सहकारी संस्था मतदार संघातून प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी उमेदवारी जाहिर केली होती . माघारीच्या शेवटच्या दिवशी ते बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली . प्रमोद पाटील चिलाणेकर हे सहकार , शिक्षण , पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी जिल्हयात चांगली मजल मारली आहे . तालुक्यातील व जिल्हयातील अनेक सहकारी संस्थांवर ते यशस्वी प्रतिनित्व करतात . ते धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शालेय समिती सचिव म्हणून उत्तम कार्य करीत आहे . लोकसंपर्कच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात त्यांचे नाव घेतले जाते . यापुर्वी या फेडरेशच्या संचालकपदी त्यांचे सासरे सहकार नेते शालीग्राम श्रीपत पाटील यांनी कामकाज पाहिले आहे . प्रमोद पाटील यांची संचालकपदी निवड झाल्याने सर्व स्तरातील नेते मंडळी व सहकारी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव केला .

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या