जवखेडे सिम (ता. एरंडोल): येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल दादा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सरपंच गौरवभाऊ पाटील, माजी सरपंच कांतीलाल सोनवणे, समाधान पाटील, प्रवीण दत्तू पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड, माजी सरपंच माधवराव पाटील, भाईदास पाटील, जिभु नाईक, पोलीस पाटील प्रशांत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. केवळ भौतिक विकास नव्हे, तर शारीरिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासही आवश्यक आहे. म्हणूनच या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालकांचे माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम यांच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री पंकज बाविस्कर सर यांनी सर्वांचे आभार मानले
0 टिप्पण्या