फरकांडे माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


घनश्याम पांडे कासोदा 
फरकांडे, तालुका एरंडोल :- येथील गायत्री विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन नानासाहेब सुखदेव पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, मुख्याध्यापक व्ही. एम. बेलदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक यश पाटील, प्रवीण वाघ, पत्रकार शालिग्राम पाटील, वि. का. सोसायटीचे माजी चेअरमन वसंत पाटील, राजेंद्र पाटील, ग्रा. प. सदस्य रवींद्र पाटील, पुरुषोत्तम चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शाळेतील स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते, यासाठी स्नेहसंमेलन सारखे सांस्कृतिक कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
विद्यालयाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विद्यालयाच्या माध्यमातून लावलेले लहान रोपटे मोठ्या वृक्षात रूपांतर झाल्याने समाधान व्यक्त केले. पुढील शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी सेमी माध्यमाचे वर्ग देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी गीतांवर नृत्य, सामाजिक नाटकांचे सादरीकरण केले. विद्यार्थिनीद्वारे सादर करण्यात आलेले शिवकन्या, दातांचे दातवन घ्या ग कुणी, नगाडा संग ढोल, राधा राणी, ललाटी भंडार, गुलाबी साडी, राधे राधे, कालीबिंदी या नृत्यांना प्रेक्षकांनी मोठी दाद देत रोख बक्षीस देण्यात आली. बागबान, विठ्ठल भक्त गोरा कुंभार व झाशीची राणी या नाट्यछटा खूप प्रभावी ठरल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन विद्यालयाच्या उपशिक्षिका शीतल वाघ, दिनेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व्ही. एम. बेलदार, उपशिक्षिका स्वाती पाटील, पूनम पाटील, प्रफुल महाजन, के. आर. पाटील, ज्ञानेश्वर अहिरे, मयूर पाटील, शिक्षकेतर कर्मचारी ललित पाटील, प्रमोद पाटील, मनोहर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या