मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा स्पर्धेत उत्राण शाळेचा दबदबा, तालुकास्तरावर पटकावला तृतीय क्रमांक..!


एरंडोल
: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात उत्राण (गु.ह.) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने तालुका स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेला गौरवपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

एरंडोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. अमोल दादा पाटील यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बळीराम सैंदाणे सर यांनी हे बक्षीस स्वीकारले. या गौरवाच्या क्षणी एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. दादाजी जाधव साहेब, उत्राण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुनिल महाजन, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. विजय पाटील, श्री. मनोहर माळे, श्री. सचिन पाटील, श्री. प्रदीप खैरनार, श्री. ओमप्रकाश जळकोटे, शिक्षिका सौ. वंदना पाटील, सौ. अर्चना सोनवणे, सौ. प्रगती खेडकर आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

शाळेने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. बळीराम सैंदाणे सर आणि सर्व शिक्षक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शाळेच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या