एरंडोल तालुका भाजपा अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची फेरनिवड


 एरंडोल प्रतिनिधी

भाजपा संघटन पर्व अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळातील अध्यक्षांची फेर निवड करण्यात आली त्यानुसार एरंडोल तालुक्यात दोन मंडळ तयार करण्यात आले असून कासोदा आडगाव व तळई उतराण जिल्हा परिषद गटाचे एक कासोदा मंडल तयार करण्यात आले असून एरंडोल शहर व विखरण रिगणगाव जिल्हा परिषद गट मिळुन दुसरें एरंडोल मंडळ आहे कासोदा मंडळाच्या अध्यक्षपदी खडके सीम येथील राजेंद्र सिंग विठ्ठल पाटील यांची फेर निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे जळगाव पश्चिम जिल्ह्यात राजेंद्र पाटील हे एकमेव मंडळ अध्यक्ष म्हणुन फेर निवड झाली आहे सदरहून निवड भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण आमदार राजु मामा भोळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जी महाराज जळकेकर नंदू भाऊ महाजन डॉ राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली राजेंद्र पाटील अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या एरंडोल तालुका अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे पार पडल्यामुळे त्यांची मंडलाध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली आहे तसेच एरंडोल तालुका एकत्र मंडळ असतानाचे ते शेवटचे तालुकाध्यक्ष ठरले आहेत यापुढे एरंडोल तालुक्यात दोन मंडल असणार असून पक्ष संघटन मजबूत होणार आहे राजेंद्र पाटील यांनी मागील लोकसभा विधानसभा निवडणूकीत सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची पावती पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिली आहे यापुढे देखील भारतीय जनता पक्ष प्रत्येक घराघरात पोहोचवणार असल्याचे त्यांनी फेर निवड झाल्यावर सांगितलं सदर निवडी प्रसंगी निवडणूक निरीक्षक म्हणून उद्धवराव माळी भडगावगोपाळ भाऊ भगाळे मिलिंद भाऊ चौधरी असोदा हे उपस्थित होते सदर निवड झाल्याबद्दल किशोर भाऊ काळकर रमेश भाऊ परदेशी रवींद्र अण्णा महाजन नरेंद्र आबा पाटील राजू आबा चौधरी दशरथ भाऊ महाजन किशोर भाऊ निंबाळकर नरेश ठाकरे जितेंद्र चौधरी ऋषिकेश पाटील सुनील भैया पाटील एस आर पाटील पिंटू भाऊ राजपूत भिका भाऊ कोळी अजित दादा पाटील छोटू शिरसागर प्रशांत पारधी प्रकाश कुवर भूषण पाटील ज्ञानेश्वर देसले संजय भाऊ चौधरी राहुल चौधरी योगेश महाजन अमरजीत पाटील निलेश परदेशी नितीन नाना पाटील अशोक चौधरी सुनील महाजन सुरेश पाटील नितीन जगताप मधुकर देशमुख बाजीराव पांढरे शाम ठाकुर नंदलाल सोनार गोपाल पाटील प्रशांत महाजन निखिल सूर्यवंशी सुनील पाटील अमोल पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या