तलाठी, रोजगार सेवक आणि शेतकरी लाच प्रकरणात अटकेत – धुळे लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

चाळीसगाव | दिनांक 30 जुलै 2025
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत एका तलाठ्यासह रोजगार सेवक आणि एका शेतकऱ्याला २५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींची माहिती:
1. मोमीन दिलशाद अब्दुल रहीम (वय 29),
पद – तलाठी, तहसील कार्यालय, चाळीसगाव,
2. वडिलाल रोहिदास पवार (वय 40),
पद – रोजगार सेवक, रा. मु.पो. लोंजे, ता. चाळीसगाव.
3. दादा बाबू जाधव (वय 40),
व्यवसाय – शेती, रा. मु.पो. लोंजे, ता. चाळीसगाव.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांसह सात इतर व्यक्तींच्या नावाने मौजे पाथरजे, ता. चाळीसगाव येथील वडिलोपार्जित शेतजमिनीवरील 7/12 उताऱ्यावर नोंद असलेल्या जुन्या व कालबाह्य हक्काच्या नोंदी कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
तक्रारदार कार्यालयात गेले असता, तलाठी मोमीन अब्दुल रहीम (आरोपी क्र. 1) यांनी त्यांना रोजगार सेवक वडिलाल पवार (आरोपी क्र. 2) यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. आरोपी क्रमांक 2 व 3 (दादा जाधव) यांनी तक्रारदारास काम करून देण्यासाठी २५,००० रुपये लाच देण्यास भाग पाडले.

लाच मागणी व सापळा:
लाच मागणीची तारीख: 3 जुलै, 14 जुलै, आणि 17 जुलै 2025
लाच रक्कम: २५,०००/- रुपये
लाच स्वीकारण्याची तारीख: 30 जुलै 2025

सदर प्रकरणात धुळे लाचलुचपत विभागाकडे 3 जुलै रोजी तक्रार दाखल झाली होती. विभागाने पंचासमक्ष प्राथमिक पडताळणी केल्यानंतर आज 30 जुलै रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचला.
या वेळी आरोपी क्र. 2 – रोजगार सेवक वडिलाल पवार यांनी तक्रारदाराकडून २५,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. त्याचवेळी तलाठी व शेतकरी यांचीही भूमिका निष्पन्न झाली.

महत्त्वाची कारवाई:
आरोपींच्या घरझडतीची कार्यवाही सुरू आहे.
आरोपींकडून 3 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.
हॅश व्हॅल्यू तयार करून व्हिडिओ पुरावा नोंदवण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

👮‍♂️ सापळा कारवाईतील अधिकारी:
सापळा अधिकारी: श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
📞 9403747157 / 9834202955

सापळा पथक:
पो.नि. पद्मावती कलाल
पो.हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा
पो.कॉ. रामदास बारेला, मकरंद पाटील
चालक पो.कॉ. जगदीश बडगुजर
(सर्व – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिट)

मार्गदर्शक अधिकारी:
मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, नाशिक परीक्षेत्र – 📞 8888832146

मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, नाशिक – 📞 9404333049
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या