बाम्हणे गावात भक्तीचा जल्लोष; ३१ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ


बाम्हणे (ता. एरंडोल, जि. जळगाव)
:बाम्हणे गावात येत्या ३१ ऑगस्टपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य हरिनाम सप्ताहाची सुरुवात होत आहे. सप्ताहाच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला असून गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.गावातील तरुणांनी पुढाकार घेत मंदिरे पाण्याने धुऊन स्वच्छ केली असून आकर्षक फुलहार व लाईटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक गल्लीबोळ स्वच्छ-सुंदर बनविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने प्रमुख रस्त्यांवरील झाडे-झुडपे काढून मार्ग मोकळे केले आहेत. गावात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्याने परिसर नवचैतन्याने उजळून निघाला आहे.या सप्ताहात दररोज हरिपाठ, भजन, कीर्तन, पालखी सोहळा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे गावात भक्तीभाव, ऐक्य आणि उत्सवाचा रंग एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहे.गावातील नागरिकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता असून “संपूर्ण गाव या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे, सप्ताहाचे दिवस हे बाम्हणेकरांसाठी सणासुदीचे पर्व ठरणार आहेत,” असे नागरिक शुभम पाटील यांनी सांगितले.३१ ऑगस्टपासून सुरू होणारा हा सप्ताह ७ सप्टेंबरपर्यंत चालणार असून अखेरच्या दिवशी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. 
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या