कार्यालयात शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन साजरा भडगांव येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन साजरा

कार्यालयात शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन साजरा भडगांव येथील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन साजरा

 ता पाचोरा 
तालुका  (प्रतिनिधी) : शहेबाज शेख
अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन भडगांव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील पाचोरा रोड वरील शिवसेना मध्यवर्ती 
कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी प्रथम भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनचा या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला सध्या 

कोरोना प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर मोजक्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वर्धापन साजरा करण्यात आला असून शिवसेनेचे व ठाकरे सरकारची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन यावेळी शिवसैनिकांना करण्यात आले सदर कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, माजी नगराध्यक्ष शशीकांत येवले, शहराध्यक्ष योगेश गंजे,डॉ.प्रमोद पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईम्रान सैय्यद,नगर सेवक जगन भोई नगरसेवक संतोष महाजन इंद्रिस कुरेशीआदी उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या