पॅसेंजर झाली एक्सप्रेस ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेने विचारला जाब सत्यता काय ?
जि जळगावपाचोरा (प्रतिनिधी) शहेबाज शेख
सध्या सर्वदूर एकच बातमी फिरतांना बघावयास मिळत आहे. पॅसेंजर झाली एक्सप्रेस म्हणून व त्यात भुसावळ देवळाली तसेच भुसावळ मुंबई पॅसेंजर चा ही समावेश असून काही स्टॉप रद्द होणार व प्रवाश्यांना दुप्पट भाडे मोजावे लागणार. अशी बातमी बातमीपत्र माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे, याबाबत ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष दिलीप पाटील यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठांशी, प्रमुखांशी संपर्क साधून खांदेशातील प्रमुख अशा प्रकारच्या बातमी पेपर मध्ये अशी जनतेची दिशाभूल करणारी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. असे निदर्शनास आणून दिले, व गरीब, ग्रामिण प्रवासी मंडळावर असा अन्याय करून त्यांना प्रवासा पासून वंचित करू नये, असा कठोर निर्णय घेऊ नये याबाबत सविस्तर चर्चा केली, व असे झालेच तर या भुसावळ विभागात तात्काळ मेमु/डेमु ट्रेन सुरू करून सर्वच स्टॉप घेतले जावे. असे सुचविले यावर अधिकाऱ्यांनी खुलासा करत सध्या तरी अशी कुठलीही अधिकृत घोषणा रेल्वे मंडळाकडून करण्यात आलेली नाही.असे पाटील यांना कळविले, त्यावर पाटील यांनी संबंधितांना या चुकीच्या अनधिकृत वृत्तप्रसिद्धी बाबत रेल्वेतर्फे लेखी नोटीस बजावत जाब विचारावा असे सांगितले, आपली सूचना तात्काळ नोंदवत शहानिशा करतो संबंधित वृत्तपत्रकांना तात्काळ नोटीस बजावतो असे दिलीप पाटील यांना अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले, तूर्त अशी बातमी फेक आहे त्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नये. असे आवाहन दिलीप पाटील यांकडून प्रवाशीनां करण्यात आले आहे,

1 टिप्पण्या
Best, good news for general people
उत्तर द्याहटवा