जागतिक सेवाभावी संस्था रेडक्रॉस ही १८७ देशांमध्ये ७० लाख स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे. सर हेत्री ड्यूनांट यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतात १९२० साली दिल्ली येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती, राज्यात राज्यपाल, तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
रेडक्रॉसच्या माध्यमातून २४ तास रक्तसेवा, कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ई-सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवले जातात. या प्रतिष्ठित संस्थेच्या जळगाव जिल्हा शाखेवर अॅड.राहुल वाकलकर यांची निवड झाल्याने चाळीसगांव तालुक्यातील युवाचेहऱ्याला पहिल्यांदा बहुमान प्राप्त झाला आहे आहे. निवडीबद्दल सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या