अहिराणी साहित्य संमेलनात युवा कवयित्री प्रेरणा पाटील यांच्या 'माय' कवितेची विशेष प्रशंसा


कासोदा ता एरंडोल 

आडगाव: अमळनेर येथे आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात युवा कवयित्री प्रेरणा पाटील यांच्या 'माय' कवितेने श्रोत्यांची मने जिंकली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले.

या संमेलनात अहिराणी भाषेला योग्य दर्जा मिळावा यासाठी ठराव मांडण्यात आला. तसेच, अहिराणी भाषेतील जुन्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यावर भर देण्यात आला. संमेलनात ग्रंथ आणि अहिराणी संस्कृती दिंडी, अहिराणी गौरव पुरस्कार, अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार, निमंत्रित कवी संमेलन, कथाकथन, परिसंवाद, नाटिका, नृत्य आणि कविता कट्टा यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संदीप बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री रेखा मराठे यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या या संमेलनात अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. युवा कवयित्री प्रेरणा पाटील यांनी 'माय' कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

संमेलनातील सर्वात तरुण कवयित्री म्हणून प्रेरणा पाटील यांच्या कवितेने विशेष लक्ष वेधले. त्यांच्या कवितेतील आईच्या भावना, मन आणि हृदयस्पर्शी शब्दांनी श्रोत्यांना भावूक केले. संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. प्रेरणा पाटील यांना या संमेलनात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रा. भगवान पाटील, डी. डी. पाटील, प्रा. अशोक पवार, प्रा. लीलाधर पाटील, रणजित शिंदे आणि डॉ. कुणाल पवार, वाल्मीक मराठे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन दिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या