(प्रतिनिधी): तालुक्यातील भिलदरी तांडा, शिवतांडा आणि हसनाबाद या गावांमध्ये नुकताच शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, या गावांतील शेतकऱ्यांमध्ये फार्मर आयडीच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली आणि त्यानंतर या कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क न आकारता फार्मर आयडी तयार करून देण्यात आले.
या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपल्या फार्मर आयडीची नोंदणी केली. या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी पो.पा. इंदल राठोड, सरपंच मनोज राठोड, गोवर्धन राठोड, समाधान मोरे, देविदास शिवदे, सोनसिंग राठोड आणि हरिभाऊ चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
युवक प्रदेश उपाध्यक्ष बंजारा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, ऋषिकेश भरत चव्हाण यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते. त्यांनी सांगितले की, 'शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे तो नाही, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येतात. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसाठी मोफत कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.'
ऋषिकेश भरत चव्हाण
युवक प्रदेश उपाध्यक्ष बंजारा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य
मो.7218380908
0 टिप्पण्या