एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळा बाम्हणे येथे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत आषाढी एकादशी निमित्त वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या पवित्र प्रसंगी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं होतं.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.किरण शांताराम पाटील उपस्थित होते. तसेच SMC समितीचे अध्यक्ष श्री.महेंद्र रविंद्र पाटील, SMC समितीचे जेष्ठ सदस्य श्री.प्रदीप गोविंदा पाटील, कॉन्ट्रॅक्टर श्री.मुकुंदा पाटील, SMC सदस्य श्री.पंकज सनेर यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
गावातील वारकरी भक्तगण, ग्रामस्थ, महिला भगिनी, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आषाढी एकादशीची महती जपत हरिनामात रमले. वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकतेसोबत सामाजिक एकोपाही वृद्धिंगत झाला.
0 टिप्पण्या