सावळदबारा येथे पीक कर्जाचे वाटप करावे, तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी यासाठी भाजपाचे आंदोलन....

सावळदबारा येथे पीक कर्जाचे वाटप करावे, तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी यासाठी भाजपाचे आंदोलन....

 ता.सोयगाव 

सोयगाव प्रतिनिधी-आज्ञानसिंग चव्हाण
दि. २२ सोमवारी आज सकाळी ११-३० वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँक सावळदबारा समोर आंदोलन,
भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, ‌
पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठी शेतकर्याचे कर्ज वाटप ठप्प आहे,
शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा विकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीक कर्जाचे वाटप सुरू करावे,
तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणी साठी भारतीय जनता पार्टी चे राज्यात ठीकठिकाणी कर्ज माफी करा, पिक कर्ज द्या, नाहीतर आंदोलन करेल अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी रविवारी केली होती
मा.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की राज्यात कोरोना चे संकट आहे, म्हणून पाऊस खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेच्या बोजवारा उडालेला आहे, कर्जाचे वाटप झाले आहे त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला, राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपाची मागणी आहे,
सावळदबारा महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर शेतकरी व बीजेपी कार्यकर्ते यांनी मिळून आंदोलन करण्यात आले
    यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ लोखंडे, माजी कृ.ऊ.बा.स. सभापती प्रमोद पाटील, विनोद टीकारे, ताराचंद राठोड (टिटवी सरपंच) शांताराम खराटे, अनिल राठोड घाणेगाव लोकेश जाधव व शेतकरी बंधू उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या