पाळधी व धरणगाव येथेना. गुलाबरावजी पाटील फाउंडेशन तर्फे सलून चालकांना अँपरन व नॅपकिन किट वाटप
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाणपाळधी तालुका धरणगाव येथे नामदार गुलाबराव पाटील फाउंडेशन च्या वतीने पाळधी बुद्रुक व पाळधी खुर्द च्या 50 सलून चालकांना ग्राहकांसाठी चे डिस्पोजल नॅपकिन किट वाटप करण्यात आले. सध्या सलून चालकांना जवळपास 90 दिवसांनंतर व्यवसायास सुरक्षिततेची साधनं वापरून परवानगी देण्यात आली आहे परंतु अनेक दिवसापासून व्यवसाय बंद असल्याने कारागीर आर्थिक विवंचनेत होता त्या अनुषंगाने नामदार गुलाबराव पाटील फाउंडेशन ने गावात सदर साहित्य वाटप केले. टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागासाठी सुद्धा फाउंडेशन तर्फे नॅपकीन किट वाटप करण्यात येईल असा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास सुरुवातीला नामदार गुलाबराव पाटील यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार प्रकाश श्रीखंडे, मदन फुलपगार यांनी केला. त्यानंतर सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येकास नामदार गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील.शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी, कल्पना महाजन, पी एम पाटील सर, भानुदास विसावे , पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे उपसरपंच चंदन कळमकर यांच्या हस्ते साहित्य किट वाटप झाले.
सूत्र संचालन गोपाल सोनवणे यांनी केले यावेळी त्यांनी समाजाच्या वतीने फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे आबा माळी, दीपक श्रीखंडे, सोनू फुलपगार ,सुभाष नन्नवरे, सादिक देशमुख, गोकुळ नाना पाटील, अनिल माळी यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या