शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी शिक्षक भारती संघटनेचे एक दिवसीय आंदोलन गटशिक्षणाधिकारी यांना दिले पदाधिकाऱ्यांनी निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) सत्तार खान
कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसलेला दिसून येतोय,त्यात शिक्षण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत.याचाच भाग म्हणून एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन शिक्षक भारती संघटनेकडून पुकारण्यात आले होते, जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदनात खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी,शाळांना कोरोना संबंधी थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमिटर, सॅनिटायजर, मास्क यांच्या साहित्य खरेदीसाठी विशेष अनुदान मंजूर करा,कोरोना काळात कुठल्याही पगारात,महागाई भत्त्यात कपात करू नये.स्थलांतरित मजुरांच्या मुलांना जवळच्या शाळेत विनाअट प्रवेश द्या, कोरोना काळात मोबाइल ऐवजी टेलिव्हिजन किंवा रेडिओचा पर्याय स्वीकारावा,ऑनलाइन शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षणाची सोय करावी,विद्यार्थ्यांना साधने उपलब्ध करून द्यावी, कोविड ड्युटीवर मृत झालेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना ५० लाखांची तातडीने मदत करावी,तसेच कोविड बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांचा उपचाराचा खर्च तातडीने द्या,कोविड काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना बदली रजा देऊन कोविड कार्याची नोंद सेवा पुस्तिकेत करावी तसेच त्यांना विशेष वेतनवाढ लागू करावी,इत्यादी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.निवेदन शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर यांनी स्वीकारले,निवेदन देतांना जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील,तालुकाध्यक्ष विशाल वाघ,कार्याध्यक्ष रोहित तेले, मुकेश पाटील,उमाकांत हिरे,राहुल पाटील,राहुल बहिरम,सुहास खांजोडकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते

0 टिप्पण्या