मा.पोलीस अधिक्षक सोो.,
पोलीस अधिक्षक कार्यालय,
जळगांव.
विषय: मी जैन इरिगेशन सिस्टीम लि.,बांभोरी येथील कमी केलेल्या कामगारांना न्याय
मिळणेसाठी त्यांचे बाबतीत आवाज उठवून त्यांना कामावर घेणेसाठी पाठपुरावा करीत
असल्याने संबंधित कंपनी प्रशासनास याच गोष्टीचे वाईट वाटत असल्याने संबंधित
कंपनी प्रशासन हे माझेवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करुन माझी बदनामी करण्याचा
जाणून-बुजून प्रयत्न करुन मला कायमचे आयुष्यांतून उठवित असलेबाबत...
अर्जदार : राजेंद्र एस.निकम,
मनसे जिल्हा संघटक,रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग,जळगांव.
महोदय,
उपरोक्त विषयांन्वये आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करीतो की, मी मागील १ ते १. ।।
वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा संघटक असून संघटनेच्या माध्यमातून गरीब अन्यायग्रस्त
लोकाना न्याय मिळवून देण्याचे काम करीत असतो. त्यात प्रामुख्याने शासकीय कार्यालये,कंपनी
प्रशासन,खाजगी संस्था इ. ठिकाणी अन्यायग्रस्त लोकांना त्यांना त्यांच्या हक्कांची जाणिव करुन न्याय
मिळवून देण्याचे काम चालू असते.
याच माध्यमातून माझेकडे जैन इरिगेशन सिस्टीम लि.,बांभोरी येथे १० ते १२ वर्षापासून
कायमस्वरुपी काम करीत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलेले होते व त्यांना त्यांच्या
हक्कांच्या रक्कमासुध्दा पाहिजे त्या प्रमाणात त्यांना देत नव्हते. तसेच संबंधित कर्मचारी यांनी याबाबत
कंपनी प्रशासनाविरुध्द आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कंपनी प्रशासनाकडून त्यांना
धमकविण्यात येत होते की, तुमचेवर पोलीसांमार्फत खोटे गुन्हे दाखल करुन तुम्हांला कायमचे आयुष्यातून
उठवून टाकू. अशा धमकी येत असल्यामुळे संबंधित कर्मचारी हे त्यांना न्याय मिळणेसाठी माझेकडे
आले व त्यांनी त्याबाबत मला लेखी अर्ज दिनांक ३०/०७/२०२१ रोजी अर्ज दिलेला होता. संबंधित कर्मचाऱ्यांचे सर्व म्हणणे समजावून घेवून मी मा.सहाय्यक कामगार आयुक्त,जळगांव यांचेकडे
संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणेसाठी दिनांक ०२/०८/२०२१ रोजी लेखी निवेदन सादर केलेले होते.
याबाबत संबंधित कंपनी प्रशासनास म.कामगार आयुक्त यांनी साधारण दि.५/८/२०२१ रोजी माहिती
कळविलेले आहे.
तरी संबंधित कंपनी प्रशासनास याबाबत माहिती झालेवरुन व सदरील कामगारांना मी मदत करीत
असल्याचे समजल्यावरुन त्यांनी मला विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे. याचेच उदाहरण
म्हणजे दिनांक २५/०८/२०२१ रोजी पाळधी पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.श्री.बुवा साहेब यांनी मला फोनवरुन
प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी बोलविले.
त्यानुसार मी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये साधारणतः ११ ते ११.३० चे दरम्यान भेटण्यासाठी गेलो.
त्यावेळी माझी व मा.ए.पी.आय.साहेब यांची जवळपास १ ते १.३० चर्चा झाली व त्यावेळी संबंधित
साहेबांनी मला सांगितले की, तुमचेविरुध्द जैन कंपनी प्रशासनाने आम्हांस लेखी तक्रार दिलेली आहे.
त्यावेळी मी संबंधितांना तक्रार वाचण्यासाठी मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. नंतर ते मला
सांगु लागले की, संबंधित तक्रारीत म्हटलेले आहे की, आपण कामगारांना विनाकारण भडकावत आहात व आमच्या कंपनीची बदनामी करीत आहेत. त्यामुळे कंपनी प्रशासन तुमचेविरुध्दकामगारांना भडकावितात त्यांना संप,उपोषण करण्याचे मार्ग सांगतात अशा आशयाची तक्रार दाखल करुन आपण त्या माध्यमातून आमचेकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न करीत असलेबाबतची तक्रार देखील आपणाविरुध्द दाखल करु असे कंपनी प्रशासन सांगत आहे.
तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.साहेब यांनी माझेकडून लेखी स्वरुपात लिहून घेतलेले
आहे की, आपण कामगारांना ज्या पध्दतीने मदत करीत आहात त्याबाबतच्या कुठल्याही बातम्या वगैरे यासोशय मिडीयावर दाखविण्यात येऊ नये, त्यामुळे कंपनीची बदनामी होत आहे.
महोदय,संबंधित कंपनी ही धनदांडगे लोकांची असून त्यांचेवर अनेक राजकीय लोकांचा वरदहस्त
आहे. त्यामुळे संबंधित कंपनी प्रशासन हे पोलीस विभागास हाताशी धरुन माझेवर खोटे गुन्हे दाखल करुन
मला कायमचे जीवनातून उठविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरुन माझ्या निदर्शनास येत आहे.
तरी आपणास माझी विनंती की,माझेविरुध्द कुठल्याही पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्रारी अर्जाची संबंधित ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती शहानिशा,चौकशी,दखल घेवून व त्याबाबत मला
कळविण्यात येऊन पुढीलकार्यवाही होणेबाबतच सूचना त्यांना आपणाकडून देण्यात याव्या.
याउपर मला जर कंपनी प्रशासनाने खोटे गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्यास मला नाईलाजाने
संबंधित कंपनी प्रशासन व जे माझेवर खोटे गुन्हे दाखल करतील त्यांचेविरुध्द मे.न्यायालयात दावा दाखल करुन दाद मागावी लागेल.
टिप : माझे अथवा माझ्या कुटुंबाचे जीवाचे काही बरेवाईट, घात-पात झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित
कंपनी प्रशासनास जबाबदार धरण्यात यावे ही विनंती.
आपला नम्र
0 टिप्पण्या