अंमळनेर - पोलिसांची बेधडक कारवाई अवैद्य 13 लाख 25 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

अंमळनेर प्रतिनिधी सत्तार खान

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 28-1-2021 रोजी दुपारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून त्यांनी मा.पोलीस अधीक्षक जळगाव श्री प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री सचिन गोरे यांच्या सूचनेप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस  अधिकारी चोपडा श्री राजेंद्र रायसिंग व मा.उपविभागीय पोलिस अधिकारी अंमळनेर श्री राकेश जाधव यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पोलिस स्टेशनचे अमलदार किशोर पाटील दीपक विसावे डॉक्टर शरद पाटील दिपक माळी रवी पाटील येथे चिंचोली भूषण बाविस्कर आशिष गायकवाड सुनील पाटील अरुण बागुल मिलिंद बोरसे आणि योगेश महाजन तसेच शासकीय पंच श्री गणेश महाजन श्री राजेंद्र पाटील फोटोग्राफर श्री पंकज पाटील आणि वजन वजन मापक श्री विनोद वर्मा असे शासकीय वाहने धरणगाव कडील ढेकू रोडावर सापळ लावून धरणगाव कडून अमळनेर कडे येणारे वाहन क्रमांक HM 19 DC 2475 व इमेज HM19 DJ 87 30 अशा टू व्हीलर वाहने ढेकू.खु गावातील श्री दत्त मंदिरा समोर यशस्वीरित्या पार पडले त्यातील आरोपी नामे राजू भावलाल पवार वय 31  मदन पवार वय 30 दिनेश मेवालाल बेलदार वय 37 अशांना तिन गुन्ह्यात 35 खाकी रंगाच्या पाकिटे गांजा ताब्यात मिळून आला गांजा एकूण 75 किलो 700 ग्रॅम बाजारभावाप्रमाणे किंमत 11 लाख 25 हजार व दोन मोटर सायकल किंमत प्रत्येकी एक लाख प्रमाणे दोन लाख रुपये एकूण मुद्देमाल 13 लाख 25 हजार किंमतीचा आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे त्यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशन गुरंन 75 21 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 20 22 भा.द.वि कलम 34 प्रमाणे गुन्हा दिनांक 29 1 2019 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे




Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या