महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी राहूल मराठे यांची नियुक्ती
कासोदा प्रतिनिधी नूरुद्दिन मुल्लाजी
कासोदा येथील पत्रकार राहूल मराठे यांना काल दि २६ जानेवारी मंगळवार रोजी जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी मूकनायक व जिवनगौरव पुरस्काराच्या आयोजीत कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्या जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याप्रसंगी जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील , जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत साहेब , पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे साहेब , माजी पालकमंत्री मा..गिरीषभाऊ महाजन , आमदार राजूमामा भोळे म.रा.म.पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष मा.किशोरजी रायसाकडा , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रविणजी सपकाळे , विभागीय उपाध्यक्ष मा..प्रमोदजी सोनवणे , विभागीय उपाध्यक्ष सागर शेलार , महिला जिल्हा अध्यक्ष नाजणींन शेख , शरद कुलकर्णी , दिपक सपकाळे , जळगाव ता.अध्यक्ष स्वप्नील सोनवणे , वासुदेव वारे , एरंडोल ता.अध्यक्ष संजय चौधरी , कार्याध्यक्ष केदार सोमाणी, प्रशांत सोनार , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी , नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जगदीश सोनवणे सह आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते ; राहुल मराठे यांच्या निवडीने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

0 टिप्पण्या