खान्देशातील 200 महाविद्यालयये 15 पासून होणार सुरू

जळगाव प्रतिनिधी

०६ फेबु्रवारी कोरोनामुळे गेल्या ८ ते १० महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या वेळी ५० टक्के क्षमतेने व शेवटच्या वर्षाचे वर्ग सुरुवातीला सुरू करण्याच्या सूचना प्राचार्यांना दिल्या. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित सुमारे दोनशेहून अधिक महाविद्यालये जिल्हाधिकार्‍यांची परवानगी मिळाल्यानंतर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव बी. व्ही. पवार यांनी देखील मार्गदर्शन केले.।


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या