कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी | निलेश शितोळे
येथील वार्ड क्र.१ गुरव व शेलार गल्ली , येथील महादेव मंदिर लगत गुरूचा आड म्हणून प्रख्यात असलेल्या ६० फूट खोल विहिरीवर लोखंडी जाळी बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये केली आहे.
या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरावर भाविक दररोज दर्शनासाठी येतात , महिला विहरीवर वापरण्यासाठी पाणी काढण्यासाठी येत असतात , तर लहान मुले गल्लीत खेळत असतात, विहरीला कठडा नसल्याने मुलं तिथे ढुंकूनही पाहतात, अनवधाने एखादी गंभीर घटना घडू शकते , व विहरीवर घरातील वाद विवाद होऊन मागील दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाने त्यात आत्महत्या करून आपले जीवन संपविले होते , तर आदीही असे कृत्य घडले असल्याचे बोलले जाते , असे प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामस्थांच्या मागणीची दखल द्यावी असे एका प्रसिध्दी पत्रकानव्ये मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सुज्ञ नागरिकांसह एक नंबर वार्डच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे ...!


0 टिप्पण्या