कासोदा प्रातिनिधी|दिपक शिंपी
मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्म 24 फेब्रुवारीला झाला म्हणुन हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो 
लिखित परंपरेचा वारसा मात्र खूप नंतरच्या काळात अस्तित्वात आला दिसतो जेव्हा कागद अस्तित्वात नव्हते तेव्हा मानव आपल्या मनातील भावनांचे आपल्याला व्यक्त कराव्या वाटणाऱ्या गोष्टींचे चित्रंण दगडावर करत असे काळाच्या ओघात ताडपत्रीवर किंवा झाडांच्या सालीवर पानावर बोरू जांभळाचा रस काजळी यांच्या सहाय्याने लिखाण केले जाई जस्ताऐवजी करणाची गरज जशी वाढत गेली तशी इन लेखनाच्या साधनांमध्ये बदल होत गेले म्हणूनच काजळी ची जागा शाईने घेतली ताळपत्री ची जागा कागदांनी घेतली आणि बोर च्या जागेवर छपाई यंत्रे आली एकूणच काय तर यांत्रिक उत्क्रांती झाल्यावर छपाई तंत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले
त्यानिमित्ताने आज कासोदा येथे बालाजी प्रिंटिंग प्रेस चे मालक सोमनाथ सोनार व रंगनाथ सोनार यांच्या बालाजी प्रिंटिंग प्रेस मध्ये जागतिक मुद्रण दिन सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी दिनेश शिंपी, प्रसाद भाऊ शिंपी, मुंबई पोलीस बंटी भाऊ शिंपी ,अक्षय भाऊ शिंपी व दिलीप भाऊ मराठे, पत्रकार दिपक भाऊ शिंपी उपस्थित होते 


0 टिप्पण्या