कासोदा येथील शिवनेरी व्यायाम शाळेच्या पठ्ठा समाधान पाटील आडगावकर यांचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

 कासोदा ता.एरंडोल( प्रतिनिधी :)- नुरुद्दीन मुल्लाजी

महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धेत आडगावच्या पै.समाधान  पाटीलने ७९ किलो वजन गटात विजेतेपद पटाकावल्याने राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे , 

पाचोरा शहरातील एन एम कॉलेज मैदानावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगली.  राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिह्याभरातून कुस्तीपटू सहभागी झाले होते. ७९ किलो वजन गटातील अंतिम लढतीत पै.समाधान ने जळगांवच्या कुस्तीपटूचा ६-४ असा पराभव करीत अजिंक्यपद मिळवले. या कामगिरीमुळे समाधानाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यासाठी समाधान चे वडील नवल पाटील , कासोद्यातील शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद पै. हनुमान पाटील , पै. गुलाब शेख , पै.नंदू पाटील , पै.जितु पाटील , पत्रकार राहुल मराठे , एरंडोलचे वस्ताद पै. सतीश महाजन , पै.मनोज पाटील सह अनेकांचे सहकार्य मिळाले आहे. 

राज्यस्तरीय कुस्तीत स्पर्धेत निवड झाल्याने पै. समाधान चे शिवनेरी व्यायाम शाळेचे वस्ताद पै. हनुमान , पत्रकार राहुल मराठे यांच्यासह आडगाव, कासोदा परिसरातून स्वागत व अभिनंदन केले जात आहे.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या