आईची महती सर्वात श्रेष्ठ असते - प्रा सुनीता गुंजाळ


कासोदा ता .एरंडोल  (प्रतिनिधी : ) नुरुद्दीन मुल्लाजी

येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेत स्व . शीला पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा .सौ. सुनीता गुंजाळ यांचा व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शालीग्राम पाटील होते . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर , कार्यध्यक्ष भगतसिंग पाटील , पर्यवेक्षक एस एस पाटील , एस टी पाटील , प्रतिभा कुमावत , ज्योती वारे आदि उपस्थित होते . प्रथम  स्व . शीला पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन सौ . प्रा . गुंजाळ यांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन किरण पाटील यांनी केले .आईची महती सांगत असतांना प्रा सौ . गुंजाळ यांनी राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , झाशीची राणी , अहिल्याबाई होळकर , मदर तेरेसा , अशा अनेक महान माहिलांचे नाव घेऊन जगामधे आई सर्वश्रेष्ठ असून आई मुलांच्या संकटात नेहमी सोबत असते . जिजाऊच्या संस्कारामुळे महान असा राजा शिवबा घडला . ज्यांचे आई वडिल हयात आहे त्यांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी . सर्व उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून आई असते . जीवनाची सुरुवात प्रथम आई गुरूमुळे होत असते . आई विषयीची अनेक उदारणे दिली हिरकणी चे उदारण देऊन मंत्रमुग्ध केले .आईची किमंत या भूमी तलावर फार महान ठरते . मुलाच्या यशामधे आईचा फार मोठा वाटा असतो . विविध भावनाशील उदारणे देऊन प्रा सुनिता गुंजाळ यांनी व्याख्यानाच्या माध्यमातुन आईचे महत्व पटवून दिले . शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी मानले . यावेळी शिक्षक वृंद , कर्मचारी वर्ग विदयार्थी . विद्यार्थीनी उपस्थित होते . कार्यक्रमात सोशल डिस्टन व सर्व नियमाचे पालन करण्यात आले होते .


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या